Abstract : सम्राट अशोक हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते ज्यांनी बौद्ध धर्माला जागतिक धर्म बनवून मौर्य साम्राज्याला सर्वोच्च स्थानी पोहोचविले. सम्राट अशोका जगाच्या इतिहासातील अद्वितीय सम्राट म्हणून ओळखला जातो .त्यांनी सत्य, अहिंसा, करुणा, शांती, दया आणि प्रेम या नीतिमूल्यांवर भर दिला. आजही त्यांची मूल्य लोकांना प्रेरणा देतात.