Abstract : आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. तीर्थक्षेत्रांना भेट देणे, स्थानिक जत्रा व यात्रा, विद्या अध्ययनासाठी दूरच्या प्रदेशात जाणे, तसेच व्यापारासाठी किंवा धार्मिक हेतूने ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे, या सर्व गोष्टींचा त्यात समावेश होतो. एकंदरीत सांगायचे झाल्यास, मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवड आहे. दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे 'पर्यटन' होय.